मोदींचे प्रेम शेतक-यांपेक्षा अंबानीवरच जास्त ऊतू जाते – धनंजय मुंडे

वैजापूर दि 21 —

राफेल विमानांच्या निर्मितीची जबाबदारी लढाऊ विमान तयार करणाऱ्या एचएएल सारख्या विख्यात सरकारी कंपनीला न देता अंबानीला देण्यात आली. या मोदी सरकारचं प्रेम अंबानीवर ऊतू जातंय मात्र आमच्या शेतकऱ्यांवर नाही अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या यात्रेच्या सतराव्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील सभेत ते बोलत होते.

वैजापूर तालुक्यात दुष्काळाची झळ लागायला सुरू झाली आहे. टॅंकर देऊ नका असे तोंडी आदेश सरकार देत आहे. जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करणाऱ्या सरकारने, पाणी नक्की कुठेय ते दाखवावं. नाहीतर जनता निवडणुकांमध्ये यांनाच पाणी पाजेल असा इशाराही मुंडे यांनी दिला.

सरकार चारा छावण्या सुरू करायला सरकार तयार नाही. मुख्यमंत्री अजूनही ठरवतायंत की छावण्या सुरू करायच्या की ऑनलाईन चारा द्यायचा. ऑनलाईनचा तर आम्ही धसकाच घेतलाय. आता चाऱ्यासाठी गायी-गुरांना सोबत आणा असं म्हटल नाही म्हणजे मिळवलं असा टोला मुंडे यांनी लगावला.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी मंत्री फोजीया खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर , सलक्षणा सलगर, आदी उपस्थित होते.

Leave a Reply