त्या संघर्षकन्यांना माझी रक्षाबंधन भेट

 

त्या संघर्षकन्यांना माझी रक्षाबंधन भेट, शिक्षणासाठी संघर्ष करणार्‍या भगिनींना घर बांधून देणार. काल एबीपी माझाचे पञकार माझे मिञ राहूल कुलकर्णी यांच्यामार्फत एक बातमी समजली ती बातमी होती. वयाच्या चौथ्या वर्षी वडीलांचे आणि चौदाव्या वर्षी आईचेही छञ हरवल्यानंतर शिक्षणासाठी संघर्ष करणार्या दोन लहान भगिनींची. उस्मानाबाद जिल्ह्यातील गोवर्धनवाडी येथील कु. निकीता मोटे व कु. पूजा मोटे या आईवडीलांचे छञ हरवलेल्या भगिनी शिक्षणांसाठी संघर्ष करत आहेत. परिस्थितीशी झुंज देत शिक्षणाची ऊर्मी कायम ठेवत कष्ट करीत आहेत त्यांच्या या जिद्दीला,कष्टाला माझा सलाम…. आज योगायोगाने राखीपोर्णीमा ! या संघर्ष करणार्‍या भगिनींसाठी मोठ्या भावाची एक छोटी भेट म्हणून त्यांना घर बांधून देण्याचा मी निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वःतहा लवकरच उस्मानाबाद येथील त्यांच्या गावी भेट देऊन या घराच्या कामाला सुरवात करून देणार आहे..!

Leave a Reply