धनंजय मुंडेंनी गावक-यांसह हाती घेतले कुदळ आणि घमेल;केले श्रमदान पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत वावरहिरे ग्रामस्थांसोबत सहभाग…

सातारा- दहीवडी दि.8 :-  हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने दौ-यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज हातात कुदळ, घमेल घेत शेतकऱ्यांसोबत श्रमदानात सहभाग घेतला.

पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाच्या सातव्या दिवसाची सुरुवात आज सातारामधून करण्यात आली. दहिवडीच्या सभेला जाताना वावरहिरे येथे पानी फाऊंडेशन आयोजित सत्मेव जयते वॉटरकप स्पर्धेतील शेतकरी श्रमदान करत होते. त्यांच्या श्रमदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,खासदार विजयसिंह मोहिते पाटील,आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, दीपक सोळुंके यांनी सहभाग घेतला. सुनिल तटकरे,धनंजय मुंडे यांनी कुदळ मारत खोदले तर धनंजय मुंडे यांनी घमेल घेत माती टाकली.

या अगोदर सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे दर्शन घेतले. आशीर्वाद घेतला आणि  राज्याला फसव्या सरकारच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर काढण्याचे साकडे घातले. शेतकऱ्यांसोबत श्रमदानात सहभागी होत काही काळ श्रमदान करून गावक-यांच्या या श्रमास यश मिळो गाव कायम दुष्काळ मुक्त होवो अशी सदिच्छा व्यक्त करुन सभेकडे रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या सहभागामुळे गावकऱ्यात उत्साह दिसून आला.

Leave a Reply