परळीत कंदील मोर्चा आज कंदील मोर्चा काढलाय उद्या जनाताच मशाली घेऊन विद्युत मंडळाच्या कार्यालयात घुसेल :- धनंजय मुंडे

परळी दि.15 :- ऐन सणासुदीच्या दिवसात अघोषित लोडशेडींग करणार्‍या एम.एस.ई.बी. च्या विरोधात आज परळीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने एम.एस.ई.बी. कार्यालयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कंदील मोर्चा काढण्यात आला. आज आम्ही कंदील मोर्चा काढला आहे, उद्या लोडशेडींग बंद न झाल्यास राज्याची जनता मशाली घेऊन एम.एस.ई.बी. च्या कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला.
राज्यातील लोडशेडींगच्या विरूध्द आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात विद्युत मंडळाच्या कार्यालयावर कंदील मोर्चे काढण्यात आले. परळीत झालेल्या या आंदोलनाचे धनंजय मुंडे यांनी नेतृत्व केले. गणेशपार येथून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो कार्यकर्ते कंदील आणि मशाली घेऊन एम.एस.ई.बी. च्या विरोधात घोषणाबाजी करत विद्युत मंडळाच्या कार्यालयावर धडकले. या ठिकाणी अधिकार्‍यांना धनंजय मुंडे यांनी कंदील भेट देऊन महागाईचा निषेध नोंदवला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संपुर्ण राज्याला विज देणारे परळी शहर आज अंधारात आहे, निवडणुका असलेल्या राज्यात कोळसा देऊन भाजपा सरकार महाराष्ट्र अंधारात ठेवत आहे. उपमुख्यमंत्री असताना अजित दादा पवार यांनी विज निर्मिती करणार्‍या परळी शहराला लोडशेडींग मुक्त करून दिले होते, याची आठवण यांनी सांगितले. फडणवीस सरकारने राज्य लोडशेडींग मुक्त करू, टँकर मुक्त करू अशा घोषणा केल्या होत्या. मात्र जनतेची फसवणूक करून राज्याला अंधारात ढकलले आहे. ग्रामीण भागात 18-18 तास लोडशेडींग करून जनतेचे हाल केले जात आहेत. दुष्काळाने अधिच त्रस्त झालेला शेतकरी लोडशेडींगच्याही जाचाला वैतागला आहे, सामान्य जनता भारनियमनाचे चटके सहन करत असून, ऐन दसरा-दिवाळीच्या सणात महाराष्ट्र अंधारात लोटला आहे. ऊर्जा विभाग नव्या 4 योजनांचा शुभारंभ करीत आहे, त्यापेक्षा त्यांनी लोडशेडींग मुक्त करण्याची योजना आणावी असा टोला लगावला. स्थानिक नेतृत्व सत्तेत असूनही परळी सारख्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणीही साधे दिवे लावता येत नाहीत. आज शेतकर्‍यांना ट्रान्सफार्मरसाठी ऑईलही मिळत नाही. भारनियमन बंद करा नाहीतर ही जनता मशाली घेऊन तुमच्या कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा श्री.मुंडे यंानी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, जिल्ह उपाध्यक्ष प्रा.डॉ.मधुकर आघाव, उपाध्यक्ष आय्युबभाई पठाण, न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड, माजी नगराध्यक्ष दिपक नाना देशमुख, जाबेर खान पठाण, चंदुलाल बियाणी, शरदभाऊ मुंडे, सुरेश टाक, प्रा.डॉ.विनोद जगतकर, अनंत इंगळे, विजय भोयटे, दत्तात्रय गुट्टे, संजय आघाव, बालाजी उर्फ पिंटु मुंडे, राजाभाऊ पौळ, दिलीपदादा कराड, गोपाळ आंधळे, श्रीकृष्ण कराड, अजिज कच्छी, पांडुरंग गायकवाड, शकिल कुरेशी, शंकर आडेपवार, जयराज देशमुख, महादेव रोडे, गोविंद कुकर, अनिल अष्टेकर, नितीन रोडे, राजाखान पठाण, ताजखॉं पठाण, संजय फड, सौ.कमलताई कुकर, प्रभाकरराव देशमुख, जयपाल लाहोटी, किशोर केंद्रे, वैजनाथ बागवाले, दत्ताभाऊ सावंत, राजेंद्र सोनी, जयप्रकाश लड्डा, सचिन जोशी, चेतन सौंदळे, ऍड.मनजित सुगरे, के.डी.उपाडे, नाजेर हुसेन, अल्ताफ पठाण, संतोष शिंदे, सुलभाताई साळवे, सौ.चित्राताई देशपांडे, सौ.वैशालीताई तिडके, महेंद्र रोडे, डॉ.अनंद टिंबे, गफ्फार काकर, बळीराम नागरगोजे, दिनेश गजमल, नारायण मुंडे, अमित दुप्ते, राजाभाऊ स्वामी, बाळासाहेब वाघ, धोंडीराम धोत्रे, कमलकिशोर सारडा, सय्यद दुल्हेपाशा, भारत ताटे, संतोष आदोडे, शकिल कच्छी, रज्जाक कच्छी, लालाखान पठाण, अमित केंद्रे, रामदास कराड, कृष्णा मिरगे, सुरेश नानवटे, धम्मा अवचारे, प्रितम जाधव, मोईन काकर, शेख हसन, मुख्तार शेख, वाजेद खान, सय्यद अल्हाउद्दीन, युनुस डिघोळकर, शेख शम्मो, शंकर कापसे, सचिन मराठे, शरद कावरे, शरद चव्हाण, चारूदत्त करमाळकर, अभिजीत तांदळे, श्रीपाद पाठक, वैजनाथ जोशी, गिरीष भोसले, रमेश पवार, अमर रोडे, अमोल रोडे, रमेश मस्के, प्रताप समिंदरसवळे, राज जगतकर, राहुल जगतकर, निलेश वाघमारे, फुलचंदराव गायकवाड, अशोकराव भोसले, जुबेर कच्छी, तौफिक कच्छी, महिपाल सावंत, तक्कीखान, राम कुकर, शाम कुकर, बाबा सरवदे, रमेश लोखंडे, पिंटु लोणिकर, श्रीनिवास देशमुख, श्रीकांत माने, रणजित देशमुख, अमोल शिंदे, मुजमुले, बंडु भाले, कृष्णा धोकटे, पिंटु दुंदूले, सतिश गंजेवार, ऋषीकेश राऊत, ऋषीकेश राठोड, आकाश डोंगरे, बालाजी दहिफळे, अजमत खान, इम्रान पठाण, अन्सार पठाण, अज्जु खान, बंडु ताटे, संतराम गित्ते, श्रीहरी कवडेकर, अनंत देशमुख, प्रशांत देशमुख, नारायण देशमुख, विष्णु साखरे, चंदु हलगे, लहु हलगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply